NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / एकाच नावाचे दोन गोलंदाज, धोनी अन् कपिल देव यांच्या कारकिर्दीत खेळले; माहितीय का?

एकाच नावाचे दोन गोलंदाज, धोनी अन् कपिल देव यांच्या कारकिर्दीत खेळले; माहितीय का?

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्यानतंर धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये आणि २०११ मध्ये वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

17

क्रिकेटसह वेगवेगळ्या खेळांमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांची नावे एकसारखी आहेत. त्यांनी आपल्या देशासाठी खेळून नावही कमावलं आहे. भारतीय क्रिकेटमध्येही असे दोन गोलंदाज आहेत ज्यांचे नाव आणि रास एकच आहे. या खेळाडूंपैकी एकाने नाव कमावलं तर दुसऱ्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. फक्त दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळून त्याचे करिअर संपुष्टात आले.

27

एका नावाचे हे दोन्ही खेळाडू भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधारासोबत खेळले आहेत. एख कपिल देव आणि दुसरं नाव महेंद्र सिंह धोनी. या दोन कर्णधारांसोबत एकाच नावाचे दोन खेळाडू खेळले त्यांचं नाव होतं रूद्र प्रताप सिंह. दोघेही उत्तर प्रदेशातील आहेत आणि त्यांना आरपी सिंह या नावानेच ओळखलं जातं. दोघेही डावखुरे आणि वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात खेळले.

37

धोनीच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या आरपी सिंहबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आऱपी सिंह ज्यूनियर मूळचा रायबरेलीचा आहे. २००४ मध्ये अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या आरपी सिंहने एका सामन्यात ८ विकेट घेत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर २००५ मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली.

47

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आरपी सिंहने ११ कसोटीत ४० विकेट घेतल्या. याशिवाय ५८ कसोटीत त्याच्या नावावर ६९ विकेट आहेत. तर १० टी२० सामन्यात १५ विकेट घेतल्या.धोनीच्या आवडत्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश असल्याचंही म्हटलं जातं. फॉर्ममध्ये नसतानाही धोनीने त्याला संघात संधी दिली होती. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

57

कपिल देव यांच्यासोबत आरपी सिंह सीनियर यांचे आंतरराष्ट्रीय करिअर केवळ दोन सामन्यांचे होते. आरपी सिंह हे कपिल देव यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आहेत. १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात कपिल देव यांच्या संघात संधी दिली. दोन एकदिवसीय सामन्यात त्यांना फक्त एक विकेट घेता आली होती. ही विकेट इंग्लंडचे डीन जॉनची होती.

67

77

  • FIRST PUBLISHED :