NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Asia Cup : रोहित शर्मा मोडणार 5 मोठे विक्रम, सचिन अन् शाहिद आफ्रिदीला टाकू शकतो मागे

Asia Cup : रोहित शर्मा मोडणार 5 मोठे विक्रम, सचिन अन् शाहिद आफ्रिदीला टाकू शकतो मागे

Rohit Sharma Records: आशिया कप स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असून यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माला सचिन तेंडुलकर, शाहीद आफ्रिदी यांचे विक्रम मोडण्याची संधी असेल. याशिवाय ५ विक्रम रोहित शर्मा आशिया कपमध्ये करू शकतो.

16

रोहित शर्मा 2008 पासून आशिया कपमध्ये खेळत आहे. गेल्या काही वर्षात त्याने अनेक यशाची शिखरे या स्पर्धेत गाठली. २०१०, २०१६ आणि २०१८ मध्ये आशिया कप चॅम्पियन संघातही तो होता. २०१८ मध्ये त्याने संघाचं नेतृत्व केलं आणि विजेतेपद मिळवून दिलं. सध्या रोहित शर्मा भारताकडून या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणाऱअया फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर २३ सामन्यांसह सचिन तेंडुलकर आहे. रोहित शर्मा आगामी आशिया कप स्पर्धेत दोन सामने खेळताच या बाबतीत चचिनला मागे टाकेल.3

26

आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने २६ षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने आशिया कपमध्ये आतापर्यंत १७ षटकार मारले असून आफ्रिदीला मागे टाकण्यासाठी त्याला १० षटकार हवे आहेत.

36

रोहित शर्माला आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्यासाठी १० षटकार हवे आहेत. भारतीय संघ श्रीलंकेत सर्व सामने खेळणार आहे. यात प्रेमदासा स्टेडियमवर रोहितने १३ तर पल्लेकलमध्ये ५ षटकार मारले आहेत.

46

आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोनच फलंदाजांनी एक हजारहून जास्त धावा केल्या आहेत. लंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या १२२० धावांसह पहिल्या क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमांकावर कुमार संगकारा आहे. कुमार संगकारा एक हजार ७५ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ आशिया कप जिंकला तर ६ सामने खेळेल. रोहित शर्माच्या आतापर्यंत ७४५ धावा झाल्या असून तो सहज १ हजार धावा पूर्ण करू शकतो. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाजही रोहित ठरेल.

56

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करण्याची संधीही रोहित शर्माला आहे. यासाठी त्याला १७५ धावा हव्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ क्रिकेटपटूंनी आतापर्यंत हा टप्पा गाठला आहे. रोहित शर्माकडे वेस्ट इंडिजविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यातही हा टप्पा गाठण्याची संधी आहे.

66

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून आतापर्यंत ५२७ षटकार मारले आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ५५३ षटकारांसह पहिल्या स्थानी आहे. रोहित शर्मा या वर्षभरात ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो. त्याला यासाठी २६ षटकारांची आवश्यकता आहे. आशिया कपमध्ये रोहित शर्मा षटकारांचे हे अंतर कमी करू शकतो. भारताकडून रोहित शर्मानंतर एमएस धोनीने ३५९ षठकार मारले आहेत. तर विराटच्या नावे २७९ आणि सचिनच्या नावावर २६४ षटकार आहेत.

  • FIRST PUBLISHED :