NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Lokesh Rahul: महागडी घड्याळं, गाड्या... अशी आहे लोकेश राहुलची लग्झरियस लाईफस्टाईल

Lokesh Rahul: महागडी घड्याळं, गाड्या... अशी आहे लोकेश राहुलची लग्झरियस लाईफस्टाईल

टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल जितका मैदानावरच्या कामगिरीसाठी लोकप्रिय आहे तितकाच त्याच्या स्टायलिश अंदाज आणि लाईफस्टाईलसाठी. पाहूयात लोकेश राहुलची आलिशान लाईफस्टाईल..

18

क्रिकेटविश्वात कन्नूर लोकेश राहुल हे नाव चांगलच परिचयाचं आहे. खरं तर लोकेश राहुल किंवा केएल राहुल या नावानं त्याची ओळख आहे. तो टीम इंडियाचा उपकर्णधारही आहे. मैदानातल्या कामगिरीबरोबरच त्याचा स्टायलिश अंदाज आणि आलिशान लाईफस्टाईलसाठी तो प्रसिद्ध आहे.

28

राहुल अनेक जगप्रसिद्ध ब्रँड्सचा ब्रँड अम्बॅसेडर आहे. प्युमासह इतर स्पोर्टस ब्रँडशीही त्याचा करार आहे. क्रिकेट व्यतिरिक्त अनेक जाहिरातीतून होणारी राहुलची कमाई बक्कळ आहे.

38

लोकेश राहुल बीसीसीआयचा ग्रेड वनचा खेळाडू आहे. बीसीसीआयकडून त्याला वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याची वार्षिक कमाई 80 कोटींच्या आसपास आहे. भारतातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटर्समध्ये त्याची गणना होते.

48

त्यामुळेच राहुलची लाईफस्टाईलही वेगळी आहे. बंगलोरमध्ये राहुलचं सन डेक अपार्टमेंट आहे. आधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज असं हे आलिशान अपार्टमेंट आहे.

58

टीम इंडियाच्या या ओपनिंग बॅट्समनला महागडी घड्याळं वापरण्याचीही आवड आहे. त्यात 27 कोटी रुपयांच्या रोलेक्स वॉचचा समावेश आहे.

68

लोकेश राहुल वापरत असलेले कपडे हे मोठमोठ्या ब्रँड्सचे आणि महागडे आहेत.

78

लोकेश राहुलच्या गॅरेजमध्ये 5 कोटीची लॅम्बोर्गिनी कार आहे. यासह ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्याही केएलकडे आहेत. 70 लाख रुपयांची बीएमडब्ल्यू एसयूव्ही कारदेखील आहे. ज्याच्या नंबर प्लेटवर केएलआर अशी अक्षरं आहेत. राहुलची सर्वात पहिली कार होती Mercedes C43 AMG सेडान.

88

लोकेश राहुल डॉग लव्हर देखील आहे. त्याच्याकडे चाऊ चाऊ जातीचा कुत्रा आहे. ज्याची किंमत 30,00 ते एक लाख रुपये एवढी आहे.

  • FIRST PUBLISHED :