महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामाच्या लिलावात भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना हिला आरसीबीने विक्रमी ३.४० कोटी रुपये किंमत मोजून संघात घेतलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये १८ नंबरची जर्सी घालून खेळतो. आता महिला आयपीएलमध्ये स्मृती मानधना १८ नंबरची जर्सी घालून खेळताना दिसेल.
स्मृती मानधना सध्या महिला टी२० वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. दुखापतीमुळे ती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकली नव्हती. पण लिलावावेळी तिची नजर टीव्हीकडे होती.
स्मृती मानधनाला सर्वाधिक किंमत मिळाल्यानंतर तिच्या सहकारी खेळाडूंनी आनंद साजरा केला. स्मृती मानधना आनंदी झालेली दिसली.
स्मृती मानधना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची कर्णधार होऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुभवी असलेली स्मृतीकडे नेतृत्व करण्याचीही क्षमता आहे.
स्मृती मानधना भारतासाठी ११२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात तिने २६५१ धावा केल्या असून २० अर्धशतके लगावली आहेत.
स्मृती मानधनाची वयाच्या ११ व्या वर्षी अंडर १९ क्रिकेट संघात निवड झाली होती. महिला वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांच्या भागिदारीचा विक्रम स्मृती मानधना आणि हरमनप्रीतच्या नावावर आहे. दोघींनी २०२२ मध्ये नाबाद १८४ धावांची भागिदारी केली होती.