मुंबईच्या श्रेयस अय्यरनं रांची वन डेत खणखणीत शतक ठोकून भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला. वन डेत श्रेयस अय्यर सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.
श्रेयस अय्यरनं गेल्या 6 वन डेत तीन अर्धशतकं आणि एक शतक झळकावलं आहे.
श्रेयसची गेल्या सहा वन डेतली कामगिरी - ना. 113, 50, 44, 63, 54, 80
श्रेयस अय्यरनं आतापर्यंत वन डे कारकीर्दीत 32 मॅचमध्ये 1271 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
श्रेयस टीम इंडियाकडून क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. पण त्याची संघातली जागा अजूनही भक्कम झालेली नाही. आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये तो स्टँड बाय खेळाडूंच्या यादीत आहे. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपपर्यंत त्याचा फॉर्म असाच राहिल्यास तो नक्कीच मधल्या फळीतला महत्वाचा खेळाडू ठरु शकतो.