NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Irani Trophy 2022: टीम इंडियात येणार आणखी एक मुंबईकर, 29 मॅचमध्ये ठोकलं दहावं शतक

Irani Trophy 2022: टीम इंडियात येणार आणखी एक मुंबईकर, 29 मॅचमध्ये ठोकलं दहावं शतक

Irani Trophy 2022: मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खाननं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आणखी एक शतक ठोकलं आहे. सध्या सुरु असलेल्या इराणी ट्रॉफीच्या सामन्यात सरफराजनं रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना पहिल्या दिवशी नाबाद 125 धावा केल्या. हे त्याचं 43 इनिंगमधलं 10वं शतक ठरलं. या खेळीनं पुन्हा एकदा टीम इंडियात येण्यासाठी त्यानं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे.

16

मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सरफराज खाननं डोमेस्टिक क्रिकेटमधला फॉर्म कायम राखला आहे. रणजी ट्रॉफी फायनल, मग दुलीप ट्रॉफी फायनल आणि आता इराणी ट्रॉफीमध्येही सरफराजनं शतकी खेळी साकारली आहे.

26

सरफराजनं इराणी ट्रॉफी सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून खेळताना पहिल्याच दिवशी सौराष्ट्रविरुद्ध नाबाद 125 धावांची खेळी केली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधलं त्याचं हे गेल्या 29 सामन्यातलं दहावं शतक ठरलं आहे.

36

इराणी ट्रॉफीतल्या या शतकासह सरफराजनं टीम इंडियाच्या कसोटी संघात येण्यासाठी निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण गेल्या 43 इनिंगमध्ये सरफराजनं 82 च्या सरासरीनं 2892 धावा केल्या आहेत. त्यात 10 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे.

46

फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या सरासरीबद्दल बोलायचं झाल्या महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन (99.94) यांच्यानंतर सरफराजचा नंबर लागतो. (82.63)

56

यंदाच्या रणजी मोसमात सरफराजनं मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यानं 6 सामन्यातील 9 डावात 123 च्या सरासरीनं 982 धावांचा रतीब घातला होता. त्यात 4 शतकं आणि 2 अर्धशतकंही होती. मध्य प्रदेशविरुद्ध फायनलमध्ये सरफराजनं 134 धावांची झुंजार खेळी केली होती.

66

सरफराज खाननं आयपीएल मध्येही 2015 पासून आतापर्यंत 46 सामने खेळले आहेत. सध्या तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.

  • FIRST PUBLISHED :