सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. ती नेहमी आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या लाईफबद्दलचे अपडेट तिच्या चाहत्यांना देते असते.
दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही त्याची पत्नी असल्याचा दावा केला. या दाव्यामुळे सध्या साराच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली.
झालं असं की, एक अज्ञात व्यक्ती साराच्या घरी वारंवार फोन करून तिला त्रास देत होता. या व्यक्तीचे नाव देवकुमार मैती असून हा व्यक्ती तो साराच्या प्रेमातइतका वेडा होता की तिच्या शिवाय त्याला काहीच दिसेनासे झाले.
देवकुमार नावाच्या उक्तीने साराच्या घरी 20 हुन अधिक फोन कॉल केले. याचा त्रास होऊन अखेर साराने या व्यक्तीविरोधात वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यात तिने म्हंटले की, "देवकुमार मैती नावाची व्यक्ती मला सतत फोन करून मी त्याची पत्नी असल्याचं सांगत आहे".
पोलीस तपासात साराला त्रास देणारी देवकुमार मैती नावाची व्यक्ती ही पश्चिम बंगालची असून ती एक मानसिक रुग्ण आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याचे कळते.
पोलिसांनी आरोपीच्या घरातून एक डायरी जप्त केली असून, यामध्ये आरोपी देवकुमारने सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव पत्नी म्हणून लिहिले होते. आरोपीची चौकशी करता त्याने सांगितले की, त्याने एका सामन्यादरम्यान साराला टीव्हीवर पाहिले होते, तेव्हापासून तो तिच्या प्रेमात पडला होता.