NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Salim Durani : अफगाणिस्तानमध्ये जन्म, पाकिस्तानात वास्तव्य; भारताकडून खेळले क्रिकेट

Salim Durani : अफगाणिस्तानमध्ये जन्म, पाकिस्तानात वास्तव्य; भारताकडून खेळले क्रिकेट

Salim Durani : चाहत्यांनी मागणी करताच षटकार मारणारा फलंदाज अशी ओळख असणाऱ्या सलीम दुर्राणी यांचे आज निधन झाले. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतही नशिब अजमावलं होतं.

16

भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. ते गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. गुजरातमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

26

दुर्राणी असे पहिले भारतीय क्रिकेटर होते ज्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. १९६० मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता.

36

भारताकडून सलीम दुर्राणी यांनी एकूण २९ कसोटी सामने खेळताना १२०२ धावा केल्या. यात त्यांनी १ शतक आणि ७ अर्धशतके केली. याशिवाय ७५ विकेटही घेतल्या होत्या.

46

सलीम दुर्राणी यांनी शेवटचा कसोटी सामना १९७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता आणि त्याच वर्षी निवृत्तीची घोषणा केली.

56

दुर्राणी यांनी चित्रपटसृष्टीतही नशीब अजमावलं होतं. सलीम यांनी चरित्र या चित्रपटात परवीन बॉबीसोबत काम केलं होतं.

66

अष्टपैलू क्रिकेटर सलीम दुर्राणी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये ११ डिसेंबर १९३४ रोजी झाला होता. काबुलमध्ये जन्मलेले दुर्राणी फक्त ८ महिन्यांचे असताना कुटुंब पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाले. कराचीत राहत असताना भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यांचे कुटुंबिय भारतात आले.

  • FIRST PUBLISHED :