टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माची लेक समायराचा 30 नोव्हेंबरला चौथा वाढदिवस आहे.
पण रोहितनं पत्नी रितिका आणि इतर काही जवळच्या मंडळींसोबत समायराचा वाढदिवस एक दिवस आधीच साजरा केला
समायराच्या वाढदिवसामित्त डिस्नेची खास थीम साकारण्यात आली होती.
वाढदिवसासाठी समायराला अनेक गिफ्ट्सही मिळाले
पण समायराचा वाढदिवस रोहित-रितिकानं एक दिवस आधीच सेलिब्रेट का केला? तर यालाही एक कारण आहे.
रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ बुधवारी बांगलादेश दौऱ्यावर निघणार आहे. त्यामुळेच रोहितनं आपल्या लेकीचा वाढदिवस एक दिवस आधीच साजरा केला.