भारताचा फिरकीपटू आर अश्विन त्याच्या मैदानावरील कामगिरीशिवाय मैदानाबाहेरही अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. अश्विन त्याच्या हजरजबाबी आणि मिश्किल बोलण्यासाठी ओळखला जातो.
गेल्या दहा वर्षांपासून क्रिकेट कारकिर्द गाजवणारा अश्विन सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. अश्विनला क्रिकेटमधील कामगिरीत चढ-उतारानंतर अनेकदा ट्रोल केलं गेलं. त्याच्यावर टीका केली गेली. तेव्हा अश्विनची पत्नी प्रीतीनेही काही वेळा टीका करणाऱ्यांना सुनावलं होतं.
आता प्रीतीने खुलासा केला की मी अश्विनची क्रश होते आणि ही गोष्ट अख्ख्या शाळेला माहिती होती. अश्विनची पत्नी प्रीतीने जिओ सिनेमाच्या शो मॅच सेंटरमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
अश्विनसोबत एकाच शाळेत शिकताना दोघे् एमेकांना ओळख असल्याचं तिने सांगितलं. प्रीती म्हणाली की आम्ही एकत्रच लहानाचे मोठे झालो. मी एका इव्हेटंस् कंपनीत काम करत होते. त्याचं माझ्यावर क्रश होतं आणि हे सगळ्या शाळेला माहिती होतं.
अश्विनने क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी दुसऱ्या शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही वाढदिवसाला किंवा शेजाऱ्यांसारखे संपर्कात होतो. जेव्हा मी सीएसकेचं अकाउंट सांभाळत होते तेव्हा मी पुन्हा त्याला भेटलो. मी अचानक त्याला सहा फुट उंचीचा खेळाडू म्हणून पाहिलं. आम्ही एकमेकांना सातवीत असल्यापासून ओळखत होतो असंही प्रीतीने सांगितलं.
प्रीती म्हणाली की,