टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहली सध्या सोशल मीडियात चांगलाच ट्रेन्ड आहे. एक आहे त्यानं पहिल्याच सराव सामन्यात पकडलेल्या कॅचमुळे आणि दुसरी गोष्ट एका फोटोमुळे. विराट कोहलीचा एका मुलीसोबतचा हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. या फोटोत असणारी ती मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडलाय.
विराटसोबत फोटोत दिसणारी ही मुलगी विराटची फॅन आहे. तिचं नाव आहे अमिषा बसेरा
अमिषा यूनिव्हर्सिटी ऑफ क्विन्सलँडची स्टुडंट आहे. तिनं ब्रिस्बेनमध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. तेव्हा विराटसोबत तिनं फोटोही काढला
विराटची खूप मोठी फॅन असलेल्या अमिषानं हा फोटो सोशल मीडियात शेअर केला. आणि त्यावर कमेंट लाईक्सचा पाऊस पडला. सोशल मीडियात हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. आणि अमिषाची चर्चाही झाली.
अमिषा सोशल मीडियात नेहमी अॅक्टिव्ह असते. पण आता विराटसोबतचा फोटो शेअर केल्यानं तिचे फॉलोअर्स आणखी वाढले आहेत.