NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : लिलावात मिळाले 50 लाख, एकटा मुंबईवर पडला भारी; 14 चेंडूत फिरवली मॅच

IPL 2023 : लिलावात मिळाले 50 लाख, एकटा मुंबईवर पडला भारी; 14 चेंडूत फिरवली मॅच

Mohit Sharma 5 Wickets: गुजरातने ५० लाख रुपयांमध्ये घेतलेल्या खेळाडूने फक्त १२ चेंडूत मुंबईची दाणादाण उडवली. त्याने ५ विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. 

17

गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली यंदाही फायनलमध्ये धडक मारली आहे. गुजरातने क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सला 62 धावांनी हरवलं. आता चेन्नईविरुद्ध अंतिम सामना होणार आहे. शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर गुजरातने 233 धावा केल्या. तर मुंबईच्या संघाला 171 धावात गुंडाळलं.

27

सामन्यात मोहित शर्माने 2.2 षटकात 10 धावा देत 5 विकेट घेतल्या. मोहित शर्माला लिलावात फक्त 50 लाखात खरेदी करण्यात आलं होतं. पहिल्या 2 चेंडूत त्याला विकेट मिळाली नाही पण पुढच्या 12 चेंडूत त्याने 5 विकेट घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. सूर्यकुमारला बाद करून त्याने मोठा अडथळा दूर केला. यंदाच्या हंगामात त्याने २४ विकेट घेतल्या असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

37

मोहित शर्माने 15 व्या षटकात मुंबईचे दोन गडी बाद केले. तिसऱ्या चेंडूवर स्फोटक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमारचा त्रिफळा उडवला. त्याने 38 चेंडूत 61 धावा केल्या. त्यानंतर पाचव्या चेंडूवर विष्णु विनोदलाही बाद केलं.

47

मोहित शर्माने 17 व्या षटकातही मुंबईच्या दोन फलंदाजांना बाद केलं. त्याने पहिल्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनला साई सुदर्शनकरवी झेलबाद केलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पीयूष चावलाला बाद केलं. दोघेही प्रत्येकी दोन धावा काढून बाद झाले.

57

मोहित शर्माने तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुमार कार्तिकेयला डेव्हिड मिलरकरवी झेलबाद करत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मुंबईचा डाव 18.2 षटकात १७१ धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू राशिद खान यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पर्पल कॅपच्या शर्यतीत मोहम्मद शमी असून त्याने आतापर्यंत 28 विकेट घेतल्या आहेत.

67

गुजरात टायटन्सला क्वालिफायर १ मध्ये चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. पण मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी चांगली कामगिरी केली. गतविजेते असलेल्या गुजरातने गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. आता सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी ते लढतील.

77

एमएस धोनीसुद्धा आयपीएल २०२३चे विजेतेपद जिंकून संघाला पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकून देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. सध्या सर्वाधिक विजेतेपद मिळवणाऱ्यांमध्ये मुंबई इंडियन्स टॉपला आहे. एमएस धोनीचे हे अखेरचे आयपीएल असल्याची चर्चा सुरू आहे. त्याने डिसेंबरमध्ये लिलावानंतर सर्व स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया यावर दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :