ऑस्ट्रेलियात आठव्यांदा टी20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जात आहे. असं म्हटलं जातंय की या स्पर्धेत गोलंदाजांचा बोलबाला राहिल. पण त्यात स्पिनर्सची जादूही चालणार असा अंदाज क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केला आहे.
वर्ल्ड कपमध्ये प्रभाव टाकणाऱ्या स्पिनर्सच्या या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे ते वानिंदू हसरंगाचं. श्रीलंकेच्या हसरंगाची गोलंदाजी खेळणं अनेक फलंदाजांसाठी कठीण ठरु शकतं. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये हसरंगाची जादू पाहायला मिळाली.
हसरंगानं श्रीलंकेकडून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 44 मॅचमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत.
ऑस्ट्रेलियात धोकादायक ठरु शकणारा दुसरा गोलंदाज आहे अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशिद खान. रशिद खान सध्या जगातल्या सर्वात यशस्वी स्पिनर्सपैकी एक आहे. त्यानं याआधी ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत. त्याचा अनुभव रशिदला उपयोगी ठरणारा आहे.
रशिदच्या नावावर आतापर्यंत 71 टी20I मध्ये 118 विकेट्स जमा आहेत.
अॅडम झॅम्पाकडून ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठ्या अपेक्षा असतील. घरच्या मैदानावर खेळणारा झॅम्पा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये नक्कीच प्रभावी ठरु शकतो.
या यादीत चौथ्या स्थानावर आहे टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल. 2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चहलला वर्ल्ड कप संघातून डावलण्याची चूक भारतानं केली होती. पण यंदा चहलवर टीम इंडियाची मोठी मदार राहिल. टी20त चहलविरुद्ध खेळणं हे भल्या भल्या फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरतं.
चहलनं आतापर्यंत 69 मॅचमध्ये 85 विकेट्स घेतल्या आहेत.
पाचव्या नंबरवर आहे पाकिस्तानचा शादाब खान. शादाब खाननं गेल्या काही वर्षात टी20 क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. 77 सामन्यात शादाबनं 87 विकेट्स घेतल्या आहे.