NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / मेस्सीचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट अन् महागड्या कार; किती आहे संपत्ती?

मेस्सीचे आलिशान घर, प्रायव्हेट जेट अन् महागड्या कार; किती आहे संपत्ती?

फिफा वर्ल्ड कपमध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने फायनलमध्ये धडक मारली आहे. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून मेस्सी फक्त एक पाऊल दूर आहे.

18

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी त्याच्या खेळामुळे फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडुंच्या यादीत त्याचे नाव आघाडीवर आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

28

अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी त्याच्या खेळामुळे फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडुंच्या यादीत त्याचे नाव आघाडीवर आहे. मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

38

नोव्हेंबर 2022 पर्यंत लियोनेल मेस्सीची एकूण संपत्ती 600 मिलियन डॉलर म्हणजेच 4 हजार 952 कोटी रुपये इतकी आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडुंमध्ये तो टॉपला आहे. खेळाशिवाय अनेक ब्रँडच्या प्रमोशनमधूनही तो मोठी कमाई करतो.

48

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार मे 2021 ते मे 2022 पर्यंत मेस्सीची ऑन आणि ऑफ फील्ड कमाई ही 130 मिलियन डॉलर इतकी होती. यात त्याने ऑन फिल्ड 75 मिलियन डॉलर आणि ऑफ फिल्ड 55 मिलियन डॉलर इतकी कमाई केलीय. मेस्सीची दररोजची कमाई ही 1 लाख 5 हजार डॉलर्स इतकी आहे.

58

मेस्सीचा बार्सिलोनात नो फ्लाय झोन बंगला आहे. तसंच तो एका हॉटेलचासुद्धा मालक आहे. बार्सिलोनात मेस्सीच्या बंगल्यात एक खासगी फुटबॉल मैदान आहे. हा बंगला नो फ्लाय झोनमध्ये आहे. तसंच त्याचं MiM Sitges नावाचं एक लग्झरियस हॉटेलसुद्धा आहे. स्पेनमध्ये इबिजा आयलँडवर एक सुंदर बंगला असून मेस्सी तिथे सुट्टी साजरी करण्यासाठी जातो.

68

मेस्सीच्या ताफ्यात लग्झरी आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे. यात अनेक हायस्पीड कार्स आहेत. दोन मिलियन डॉलर्सची Pagani Zonda Tricolore, Masserati GranTurismo, Ferrari F430 Spyder, Dodge Charger SRT8, Audi-Range Rover या गाड्या आहेत.

78

मेस्सीकडे प्रायव्हेट जेट असून कुटुंबियांसोबत तो यातून प्रवास करतो. प्रायव्हेट जेटवर मेस्सीचा जर्सी नंबर 10 सुद्धा टाकला आहे. प्रायव्हेट जेटची किंमत 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. मेस्सीसाठी या जेटची निर्मिती अर्जेंटिनातील एका कंपनीने केली होती. या जेटमध्ये दोन बाथरूम, एक किचन आणि 16 हून जास्त लोकांना बसण्यासाठीची जागा आहे.

88

मेस्सीने मार्च 2022 मध्ये फॅन एंगेजमेंट अॅप Socios सोबत एक करार केला होता, त्यासाठी वर्षाला 20 मिलियन डॉलर्स मिळणार आहेत. यासोबतच मेस्सीने स्वत:ची क्लोथिंग लाइन सुरू केली असून पहिसं रिटेल आउटलेट २०१९ मध्ये बार्सिलोनात उघडलं होतं. याशिवाय Adidas सारख्या प्रसिद्ध ब्रँडसोबत त्याचा लाइफटाइम करार आहे.

  • FIRST PUBLISHED :