NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Ashes 2021 : विराटपेक्षा जास्त पगार घेऊनही फायदा नाही, बॅटिंगमध्ये हिरो कॅप्टन्सीमध्ये झिरो, सीरिजच नाही इज्जतही घालवली!

Ashes 2021 : विराटपेक्षा जास्त पगार घेऊनही फायदा नाही, बॅटिंगमध्ये हिरो कॅप्टन्सीमध्ये झिरो, सीरिजच नाही इज्जतही घालवली!

Ashes 2021 : अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी पराभव केला आणि ऍशेस मालिका जिंकली. 2021 मध्ये जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 9 कसोटी सामने गमावलेले आहेत.

16

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 1700 हून अधिक धावा केलेल्या आहेत पण कर्णधार म्हणून तो सपशेल अपयशी ठरला आहे. इंग्लंडच्या संघानं या वर्षात 9 कसोटी सामने गमावलेले आहेत. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही इंग्लंडची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.

26

इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) वार्षिक 7.22 कोटी रुपये मिळतात, जे विराट कोहलीला मिळणाऱ्या 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र जगातील सर्वात महागडा कसोटी कर्णधार असलेला रूट इंग्लंडला यश मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. या वर्षी भारताने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं.

36

जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने बांगलादेशच्या लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी केली. बांगलादेशने एका वर्षात 9 कसोटी सामने गमावलेले आहेत. इंग्लंडने यापूर्वी 1984, 1986, 1993 आणि 2016 मध्येही आठ कसोटी समाने गमावले होते.

46

जो रूट मात्र फलंदाज म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. रूटने यावर्षी 15 कसोटी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 61 च्या सरासरीने 1708 धावा केल्या. त्याने 6 शतकं आणि 4 अर्धशतकं केली आहेत. हा विश्वविक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे ज्याने 2006 मध्ये 11 सामन्यात 1788 धावा केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज विव्ह रिचर्ड्सचा क्रमांक लागतो, ज्याने 1976 मध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 1710 धावा केल्या होत्या.

56

जो रुटशिवाय इंग्लंडच्या इतर कोणत्याही फलंदाजाने यावर्षी 600 धावांचा टप्पा गाठलेला नाही. रॉरी बर्न्स 530 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

66

अॅशेस मालिका गमावल्यानंतर आम्हाला जोरदार पुनरागमन करावं लागेल आणि पुढील दोन सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :