रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत असून यात १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. तर उमेश यादव तंदुरुस्त नसल्याने संघाबाहेर आहे.
दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने ५ बाद २२९ धावा केल्या आहेत. अजून ते २०९ धावांनी पिछाडीवर आहेत. भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि उमेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे. तर जयदेव उनादकटला अद्याप एकही गडी बाद करता आलेला नाही.
जयदेव उनादकट ३१ वर्षांचा असून त्याने २०१० मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत केवळ तीनच विकेट त्याला घेता आल्या आहेत. डिसेंबर २०१० नंतर त्याला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यात दुसरी कसोटी खेळण्याची संधी मिळाली होती. तर सध्याच्या दौऱ्यात दोन कसोटीत अजून तो विकेटच्या शोधात आहे.
जयदेव उनादकटने डोमिनिकात झालेल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ७ तर दुसऱ्या डावात २ षटके गोलंदाजी केली होती. फिरकीपटू अश्विनने १२ विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आता दुसऱ्या कसोटीत उनादकटने पहिल्या डावात १६ षटके टाकली तरी त्याला विकेट घेता आली नाही. यात त्याने ४४ धावा दिल्या आहेतत आणि ३ षटके निर्धाव टाकली.
भारताला पुढची कसोटी मालिका डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायची आहे. तोपर्यंत जसप्रीत बुमराह पुनरागमन करेल आणि मोहम्मद शमी, उमेश यादव हेसुद्धा संघात परततील. त्यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर जयदेव उनादकटला संधी देणं कठीण होईल.
team India huddle kl rahul