अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्सने 9 कोटी रुपयांना विकत घेतलं. दिल्लीची ही निवड अक्षर पटेलने योग्य ठरवली. अक्षरने या मोसमात 9 विकेट घेतल्या एवढच नाही तर तो टीमचा दुसरा टॉप प्लेअरही ठरला आहे. अक्षरने या मोसमात 267 रन केल्या आहेत. अक्षर वगळता दिल्लीच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये निराशच केलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉ यांना 7.5 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण या मोसमात पृथ्वी शॉ सुपर फ्लॉप ठरला. पृथ्वीने 6 सामन्यांमध्ये फक्त 47 रन केले आहेत, ज्याचा मोठा फटका दिल्लीला बसला आहे.
एनरिक नॉर्कियाला विकत घेण्यासाठी दिल्लीने 6.5 कोटी रुपये मोजले. पण दक्षिण आफ्रिकेच्या या फास्ट बॉलरला 8 मॅचमध्ये फक्त 7 विकेट मिळाल्या.
डेविड वॉर्नर दिल्लीकडून या मोसमात खेळणारा चौथा सगळ्यात महागडा खेळाडू आहे. वॉर्नरला दिल्लीने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. वॉर्नरने या मोसमात दिल्लीसाठी सर्वाधिक 330 रन केले आहेत, पण त्याचा स्ट्राईक रेट खराब आहे. वॉर्नरने 119.56 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आहे.
मिचेल मार्शला दिल्लीने 6 कोटी रुपयांना विकत घेतलं. अक्षरनंतर मार्शनेच टीमने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला, त्याने 8 मॅचमध्ये 12 विकेट घेतल्या आणि 93 रन केले.
दिल्लीने मुकेश माथुरला 5.5 कोटी, खलील अहमदला 5.25 कोटी, राईली रुसोला 4.6 कोटी आणि चेतन सकारियाला 4.2 कोटी रुपये दिले, पण यातल्या एकाही खेळाडूला त्याच्या किंमतीला साजेशी खेळी करता आली नाही.
दिल्लीने रोव्हमन पॉवेलला 2.8 कोटी आणि मनिष पांडेला 2.4 कोटी रुपये मोजले. पांडेने 9 सामन्यांमध्ये 160 आणि पॉवेलने 3 मॅचमध्ये फक्त 9 रन केल्या. फिल सॉल्टसाठी टीमने 2 कोटी रुपये मोजले तर मुस्तफिजुर रहमानलाही 2 कोटी दिले.
2 कोटींच्या कुलदीप यादवने त्याची किंमत योग्य ठरवली, त्याने 11 सामन्यांमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत. कुलदीपने 30.44 ची सरासरी आणि 7.02 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे. कुलदीपने विरोधी टीमच्या बॅटिंगवर दबाव तर बनवला, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. कमलेश नागरकोटीला दिल्लीने 1 कोटीला विकत घेतलं, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही.