NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : माहीची परी 'बाबा' सोबत मैदानात, इतका बदलला झिवाचा लूक, Photo

IPL 2023 : माहीची परी 'बाबा' सोबत मैदानात, इतका बदलला झिवाचा लूक, Photo

Ziva Singh Dhoni : एमएस धोनी आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करत आहे. 41 वर्षांचा धोनी आयपीएलमधल्या निवृत्तीवरून कायमच चर्चेत येत आहे, पण यंदा एमएस धोनीची मुलगी झिवा चर्चेत आली आहे. सीएसकेने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून झिवाचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये झिवाचा नवा लूक दिसत आहे.

16

सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी फक्त भारतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. एमएस धोनीचा चाहता वर्ग जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. धोनीच्या चाहत्यांना त्याच्या खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यातही रस असतो. याच कारणामुळे धोनीची मुलगी झिवाचीदेखील कायमच चर्चा होते. आयपीएल 2023 दरम्यानही झिवाचा फोटो समोर आला आहे, ज्यात तिचा बदलेला लूक पाहायला मिळत आहे. (CSK, Ziva Singh Dhoni/Instagram)

26

8 वर्षांची झिवा आयपीएलमध्ये सीएसकेला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर येते, यावेळी मात्र अर्धी आयपीएल संपल्यानंतर ती स्टेडियममध्ये दिसली. (CSK/Instagram)

36

सीएसके आणि मुंबईविरुद्धच्या मॅचवेळी झिवा स्टेडियममध्ये आली होती, तेव्हा सीएसकेने तिचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये झिवा वडील आणि सीएसकेला चीअर करताना दिसत होती. (CSK/Instagram)

46

आता चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा झिवाचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये एमएस धोनी आणि झिवा एकत्र उभे असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये झिवाने ग्रेल कलरचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची शॉर्ट घातली आहे. (CSK/Instagram)

56

सीएसकेने झिवा आणि एमएस धोनीसोबतच सीएसकेच्या इतर खेळाडूंच्या मुलांचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रॉबिन उथप्पा आणि दुसऱ्या क्रिकेटपटूंची मुलं मैदानात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. तर एमएस धोनीची मुलगी मैदानात फुटबॉल खेळत आहे. (CSK/Instagram)

66

झिवाचा एमएस धोनीसोबतचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. झिवाच्या फुटबॉल खेळतानाच्या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. तसंच तिचा बदलेला लूकही चाहत्यांना आवडला आहे. (CSK/Instagram)

  • FIRST PUBLISHED :