विराट कोहली हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटर आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार क्रिकेटर असलेल्या विराटने आतापर्यंत 6788 धावा केल्या आहेत.
पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन हा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवन हा सर्वोच्च स्थानावर जाण्यासाठी केवळ 311 धावांनी मागे असून त्याने आतापर्यंत 6477 रन्स केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वॉर्नर हा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने 6090 रन्स केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला तब्बल पाच वेळ आपल्या नेतृत्वाखालीची आयपीएल जिंकून देणारा रोहित शर्मा याने आयपीएलच्या इतिहासात 5966 धावा केल्या आहेत.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना हा या यादीत पाचव्या स्थानी असून त्याने 5528 धावा केल्या आहेत.