NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : शुभमनचा कॅच, फलंदाजी क्रम अन् खेळाडुंच्या दुखापतीने मुंबईला पराभवाची 'जखम'

IPL 2023 : शुभमनचा कॅच, फलंदाजी क्रम अन् खेळाडुंच्या दुखापतीने मुंबईला पराभवाची 'जखम'

क्वालिफायर दोनच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई झाली. तर ऐनवेळी खेळाडुंच्या दुखापतीने टेन्शन वाढवलं. याशिवाय फलंदाजी क्रमातही रोहित शर्माने मोठी चूक केली.

19

आयपीएल 2023 च्या क्वालिफायर दोनमध्ये शुक्रवारी गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला 62 धावांनी हरवून दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. 28 मे रोजी त्यांचा सामना चेन्नईविरुद्ध होणार आहे.

29

क्वालिफायर दोनमध्ये शुभमन गिलने जबरदस्त फलंदाजी करत 60 चेंडूत 7 चौकार आणि 10 षटकार मारत 129 धावा केल्या.

39

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने क्षेत्ररक्षण करताना गचाळ कामगिरी केली. गोलंदाजांची धुलाई झाली. तर ऐनवेळी खेळाडुंच्या दुखापतीने टेन्शन वाढवलं. याशिवाय फलंदाजी क्रमातही रोहित शर्माने मोठी चूक केली.

49

शुभमनचा झेल - शतक करणाऱ्या शुभमन गिलचा 30 धावांवर झेल टीम डेविडने सोडला. हा झेल सोडणं मुंबईला महागात पडलं. त्यानंतर शुभमनने 99 धावा अक्षरश: चोपल्या.

59

दुखापतींचे ग्रहण - मुंबईचा फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशनला ख्रिस जॉर्डनच्या हाताचा कोपरा लागल्यानं दुखापत झाली. तो फलंदाजीही करू शकला नाही. तर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनलाही दुखापत झाली. ग्रीन रिटायर्ड हर्ट होऊन परतला. तो काही वेळाने पुन्हा फलंदाजीला आला.

69

सलामीवीर अपयशी - गुजरात टायटन्सने दिलेलं २३४ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या मुंबईच्या सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. पहिल्याच षटकात शमीने दणका दिला. त्यानंतर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा तर पॉवर प्लेमध्ये अखेरच्या चेंडूवर तिलक वर्मा बाद झाला.

79

फलंदाजी क्रम - कॅमेरून ग्रीन बाद झाला तेव्हा मुंबईची धावसंख्या चांगली होती. तेव्हा 52 चेंडूत 109 धावा हव्या असताना टीम डेव्हिडला न पाठवता विष्णू विनोदला वरती पाठवले गेले. सूर्यकुमार यादव बाद झाल्यानतंर टीम डेव्हिड आला. जर तो आधी आला असता तर सूर्यकुमारसोबत त्याने धावा केल्या असत्या.

89

सूर्यकुमार बाद - फॉर्ममध्ये असणाऱ्या सूर्यकुमार यादवने 38 चेंडूत 61 धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा संघाच्या धावा 14.3 षटकात 5 बाद 155 इतक्या होत्या. तर विजयासाठी 33 चेंडूत 78 धावांची गरज होती.

99

गोलंदाजीची धार बोथट - गुजरातच्या फलंदाजांना रोखण्यात मुंबई इंडियन्सची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. शुभमन गिलने सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतला. जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत डेथ ओव्हर्समध्ये धावा रोखण्यात मुंबईला अपयश आलं.

  • FIRST PUBLISHED :