चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आय़पीएल २०२३ फायनलमध्ये नियोजित दिवशी पावसाने तुफान बॅटिंग केली. यामुळे राखीव दिवशी सामना खेळवण्यात येणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच राखीव दिवशी अंतिम सामना खेळवला जात आहे. दरम्यान, सामना पुढे ढकलल्याने चाहत्यांची निराशा झाली.
आयपीएलने पहिल्या दिवशीची तिकिटे राखीव दिवशी वैध असणार असल्याचं सांगितलं आहे. पण सामना होऊ न शकल्यानं चाहत्यांना बराच त्रास सहन करावा लागला.
एका ट्विटर युजरने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातलेले चाहते स्टेशनवर झोपले असल्याचं दिसतंय.
एका ट्विटर युजरने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातलेले चाहते स्टेशनवर झोपले असल्याचं दिसतंय.
अहमदाबादमध्ये आज सकाळी कडक ऊन असणार आहे. मात्र सायंकाळी ढगाळ वातावरण असेल. सायंकाळी चार ते 6 वाजण्याच्या दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.