आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला हरवले.
गुजरातच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात स्टेडियममध्ये मात्र धोनीच्या चाहत्यांची संख्या जास्त दिसत होती.
एमएस धोनी हा यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वयस्क खेळाडू आहे.
आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चारवेळा विजेतेपद पटकावलं आहे. तसंच आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०० सामने जिंकणारा तो एकमेव आहे.
आयपीएलआधी सराव करताना धोनीच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.
उद्घाटनाचा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्याने तर हद्दच केली. त्याने गर्लफ्रेंड की धोनी यात धोनीचीच निवड करत स्टेडियम गाठलं.