NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Champions! पहिला U19 महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 11 रणरागिणी, पाहा फोटो

Champions! पहिला U19 महिला वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 11 रणरागिणी, पाहा फोटो

अंडर १९ महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला ६८ धावात गुंडाळून भारताच्या महिला संघाने ६९ धावांचे आव्हान ३ विकेटच्या बदल्यात पूर्ण केले.

111

Shafali Verma (c) भारताच्या महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली अंडर १९ महिला संघाने पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरलं. शफाली वर्माने अंतिम सामन्यात एक विकेट घेतली, मात्र तिला फलंदाजीत मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

211

Shweta Sehrawat : सेमीफायनलमध्ये श्वेता सेहरावतच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला होता. पण फायनलमध्ये तिला फक्त ५ धावाच काढता आल्या.

311

Soumya Tiwari : शफाली वर्मा आणि श्वेता बाद झाल्यानंतर सौम्या तिवारीने त्रिशासोबत मिळून डाव सावरला. तिने नाबाद २४ धावा केल्या.

411

Gongadi Trisha : सौम्या तिवारीसोबत त्रिशाने ४६ धावांची भागिदारी केली. त्रिशाने २९ चेंडूत २४ धावा काढल्या.

511

Richa Ghosh (wk) : यष्टीरक्षक रिचा घोषने इंग्लंडच्या हॅना बेकरला शून्यावर यष्टीचित केलं. शफाली वर्माच्या गोलंदाजीवर चपळाई दाखवत रिचाने बेकरला बाद केलं.

611

Hrishita Basu : हर्षिता बसूने सेमीफायनलमध्ये क्षेत्ररक्षणात जबरदस्त कामगिरी केली होती. अंतिम सामन्यात फलंदाजी करताना एकच चेंडू खेळायला मिळाला.

711

Titas Sadhu : तितास साधूने ४ षटकात टिच्चून मारा करताना फक्त ६ धावा दिल्या आणि २ विकेट घेतल्या.

811

Mannat Kashyap : मन्नत कश्यपने अंतिम सामन्यात ३ ओ्हरमध्ये १३ धावा देत १ विकेट घेतली.

911

Archana Devi : अर्चना देवीने आघाडीच्या बॅटर्सना बाद करून इंग्लंडला दोन धक्के दिले.

1011

Parshavi Chopra : सेमीफायनलमध्ये ३ विकेट घेणाऱ्या पार्शवीने या फायनलमध्येही १३ धावात २ विकेट घेतल्या.

1111

Sonam Yadav : सोनमने १.१ ओव्हर टाकताना ३ धावा देत एक विकेट घेतली. तिने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत अखेरचा गडी बाद केला.

  • FIRST PUBLISHED :