हॉकी वर्ल्ड कपचे आयोजन १३ जानेवारीपासून भुवनेश्वर आणि राउरकेला शहरात करण्यात आलं आहे. यात भारतीय संघ इंग्लंड, वेल्स आणि स्पेनसोबत पूल डी मध्ये आहे.
भारताचा पहिला सामना स्पेनविरुद्ध होणार आहे. याआधी भारताच्या क्रिकेटपटूंनी हॉकी संघाला वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकरने ट्विटरवर म्हटलं की, 'भारताच्या हॉकी संघाला वर्ल्ड कपसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही तुम्हाला चीअर अप करतोय. चक दे'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने शुभेच्छा देताना म्हटलं की, वर्ल्ड कपसाठी आपल्या भारतीय संघाला माझ्याकडून शुभेच्छा. जा आणि एन्जॉय करा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. गुड लक.
भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने टीम इंडियाला शुभेच्छा देताना भारतीय पाठिराख्यांनाही आवाहन केलं आहे. टीम इंडियाला यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या आपल्या संघाला चीअर करूया असं लक्ष्मणने म्हटलं.
भारतीय महिला क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्जने व्हिडीओ शेअर करत भारताच्या हॉकी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. जीतेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा. लेट्स गो बॉइज असं म्हणत जेमिमाने शुभेच्छा दिल्या.