टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लिश गोलंदाजांच्या प्रभावी आक्रमणासमोर पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 137 धावाच करता आल्या.
इंग्लंडसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करन. त्यानं 4 ओव्हरमध्ये अवघ्या 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
फायनलमधल्या कामगिरीसह सॅम करन यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा बॉलर बनला आहे. त्यानं या वर्ल्ड कपमध्ये 7 मॅचमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.
लेग स्पिनर आदिल रशिदनंही निर्णायक सामन्यात कमाल केली. त्यानं मोहम्मद हॅरिस आणि कॅप्टन बाबर आझमची विकेट घेत इंग्लंडला फ्रंटफूटवर नेऊन ठेवलं.
ख्रिस जॉर्डननंही प्रभावी मारा करताना 27 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.
अष्टपैलू बेन स्टोक्सनही 32 धावात 1 विकेट घेतली.