NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / एक क्रिकेटचा देव अन् दुसरा फुटबॉलचा; सचिन मेस्सीचा वर्ल्ड कपचा सेम टू सेम प्रवास

एक क्रिकेटचा देव अन् दुसरा फुटबॉलचा; सचिन मेस्सीचा वर्ल्ड कपचा सेम टू सेम प्रवास

सचिनचे कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले. तसंच मेस्सीचाही हा अखेरचा वर्ल्ड कप होता आणि इतर सगळे बहुमान पटकावलेल्या मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. दोघांनाही वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण होण्याच्या ८ वर्षे आधी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

16

भारतात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. फुटबॉलमध्ये हीच उपाधी आता मेस्सीला दिली जाते. भारतासह जगभरात मेस्सीचे चाहते आहेत. आपल्या कारकिर्दीत एकदा वर्ल्ड कप जिंकण्याचं मेस्सीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.

26

फ्रान्सला पराभूत करून अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप जिंकला. मेस्सीच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरनेसुद्धा ट्विटरवरून त्याच्यासह अर्जेंटिनाच्या संघाचे अभिनंदन केलं. दरम्यान, मेस्सीने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याच्या योगायोगाची चर्चा सोशल मीडियावर रंगला आहे.

36

सचिन आणि मेस्सी हे दोघांच्याही जर्सीचा नंबर एकच आहे. दोघेही १० नंबरच्या जर्सीमुळे त्यांच्या खेळात ओळखले जातात.

46

मेस्सीला आठ वर्षांपूर्वी जर्मनीविरुद्ध वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तर २००३ मध्ये वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावं लागल्याने सचिनचं स्वप्न पूर्ण झालं नव्हतं.

56

सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध २०११ मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. तर मेस्सी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये क्रोएशियाविरुद्द सेमीफायनलमध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता.

66

सचिनचे कारकिर्दीतील अखेरच्या वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले. तसंच मेस्सीचाही हा अखेरचा वर्ल्ड कप होता आणि इतर सगळे बहुमान पटकावलेल्या मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. दोघांनाही वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण होण्याच्या ८ वर्षे आधी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

  • FIRST PUBLISHED :