फिफा वर्ल्ड कप २०१४मध्ये अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का बसला होता. तेव्हा लियोनेल मेस्सी खूपच नाराज दिसत होता. अंतिम सामन्यात पराभवानंतर त्याच्या अश्रू तरळल्याचं जगाने पाहिलं होतं. त्यानतंर आता २०२२ चा वर्ल्ड कप जिंकल्यानतंर आनंदाचे अश्रूही आले. मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजोने वर्ल्ड कप विजयानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
एंटोनेला रोकुजोने इन्स्टाग्रामवर मेस्सीसह मुलांसोबतचे फोटो शेअर करताना म्हटलं की, वर्ल्ड चॅम्पियन, मला माहिती नाही की कुठून सुरू करायचं, आम्हाला तुझा किती अभिमान वाटतो. आम्हाला कधीच हार न मानण्याचं शिकवण्यासाठी आभारी आहे.
आपल्याला शेवटपर्यंत लढायचं आहे. शेवटी तू एक वर्ल्ड चॅम्पियन आहेस आणि आम्हाला माहितीय की इतकी वर्षे तू काय सहन केलंस, तुला हे का मिळवायचं होतं. चल अर्जेंटिनाला जाऊ असं रोकुजोने तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
फायनल जिंकल्यानंतर मेस्सीचा आणि त्याच्या आईचा फोटोही व्हायरल होत आहे. अर्जेंटिनाची जर्सी घालून मेस्सीची आई मैदानात आली होती. विजयानंतर मेस्सीला धावत येईन मिठी मारली. तेव्हा मेस्सीची आई अश्रू रोखू शकली नाही.
मेस्सीची पत्नी एंटोनेलो रोकुजो त्याची बालपणीची मैत्रिण आहे. दोघांनी दीर्घकाळ कोर्टशिपनंतर २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यांनी थइयागो, मातेओ आणि सिरो ही तीन मुले आहेत.