हिटमॅन रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेहने इन्स्टा स्टोरीला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा मुलीसाठी गिफ्ट पॅक करताना दिसत आहे. रोहित शर्मा सध्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे.
२०२२ हे वर्ष सूर्यकुमार यादवसाठी अविस्मरणीय असं होतं. सूर्यकुमारने २०२२ मध्ये टी२० क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजीने सर्वांची मने जिंकली. सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली यांनी Happy Feet Home Foundationच्या मुलांसोबत ख्रिसमस साजरा केला. सचिन यावेळी मुलांसोबत क्रिकेट आणि कॅरम खेळला. मुलांना मिठाईचे वाटपसुद्धा करण्यात आले.
भारताचा सलामीवीर मयंक अग्रवालने त्यांच्या नवजात बाळाचा आणि पत्नीचा फोटो शेअर केला आहे. त्याने म्हटलं की, आमच्यासाठी हा डिसेंबर अविस्मरणीय असा आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने पत्नी प्रियांकासह ख्रिसमस ट्रीसोबतचा फोटो शेअर केला आहे. सुरेश रैनाने सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्फोटक बॅटर शेफाली वर्माने इन्स्टाग्रामवर ख्रिसमस ट्रीसोबत एक फोटो शेअर केला आहे.
भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने पती पारुपल्ली कश्यपसह संघातील सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन केलं. सायनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर मुलगी जिवासोबतचा फोटो शेअर केला आहे. साक्षीने एक व्हिडीओसुद्धा पोस्ट केला असून यात ते ख्रिसमस सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.