NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / 14 वर्षांनी लहान तरुणीनं रोनाल्डोला लावलंय वेड, चौथ्यांदा करणार लग्न, Ex बायकोवरही तितकंच प्रेम

14 वर्षांनी लहान तरुणीनं रोनाल्डोला लावलंय वेड, चौथ्यांदा करणार लग्न, Ex बायकोवरही तितकंच प्रेम

रोनाल्डो गेल्या सात वर्षांपासून ब्राझिलियन गर्लफ्रेंड असलेल्या सेलिनाला डेट करत आहे. ती एक मॉडेल असून यशस्वी व्यावसायिकसुद्धा आहे.

16

ब्राझीलचा फुटबॉलपटू रोनाल्डो चौथ्यांदा लग्न करणार आहे. कॅरेबियन अयलँडवर सुट्टी साजरी करायला गेल्यावर त्याने गर्लफ्रेंड सेलिनाला प्रपोज केलं. रिअल मद्रीद आणि इंटर मिलानसारख्या क्लबकडून खेळलेला रोनाल्डो ४६ वर्षांचा असून त्याची गर्लफ्रेंड १४ वर्षांनी लहान आहे. सेलिनाचं वय ३२ वर्षे इतकं आहे.

26

सेलिनाने सोशल मीडियावर एंगेजमेंट रिंगचा फोटो शेअऱ करताना म्हटलं की, हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे. यावर रोनाल्डोने हार्टचे इमोजी शेअर करत लव्ह यू असा रिप्लाय दिला.

36

विशेष म्हणजे रोनाल्डो आणि त्याची गर्लफ्रेंड सेलिना यांचे अभिनंदन सर्वात आधी करणाऱ्यांमध्ये रोनाल्डोची घटस्फोटीत पत्नी मिलने डॉमिनेजेस ही होती. तिने म्हटलं की, तुमच्यासाठी मी आनंदी आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि सुखरुप ठेवूदे. तुमच्यातलं प्रेम कायम राहो.

46

रोनाल्डो गेल्या सात वर्षांपासून ब्राझिलियन गर्लफ्रेंड असलेल्या सेलिनाला डेट करत आहे. ती एक मॉडेल असून यशस्वी व्यावसायिकसुद्धा आहे. ब्राझीलकडून ९८ सामने खेळलेल्या रोनाल्डो आणि सेलिनाने अद्याप त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही.

56

चार वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आल्यानतंर फेब्रुवारी २००५ मध्ये रोनाल्डो आणि डेनियला सिसेर्ली हे रिलेशनशिपमध्ये आले होते. दोघांनी कधीच आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं नाही. अलिशान महालात त्यांनी लग्न केलं पण रोनाल्डोवर दगाबाजीचा आरोप करत डेनियलाने नातं संपवलं होतं.

66

रोनाल्डोने इंजिनिअरिंग झालेल्या मारिया बिट्रिज एंटनीसोबत लग्न केलं. दोघांचं नातं ७ वर्षे टिकलं. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत.

  • FIRST PUBLISHED :