NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023: वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू IPL मध्ये होणार मालामाल, पाहा कुणाला लागू शकते सर्वाधिक बोली?

IPL 2023: वर्ल्ड कप गाजवणारे खेळाडू IPL मध्ये होणार मालामाल, पाहा कुणाला लागू शकते सर्वाधिक बोली?

IPL 2023: येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये आयपीएल 2023 साठीचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात टी20 वर्ल्ड कप गाजवलेल्या खेळाडूंवर फ्रँचायझींची नजर राहील. हे स्टार खेळाडू कोण आहेत यावर एक नजर टाकूयात...

17

ऑस्ट्रेलियात पार पडलेला यंदाचा टी20 वर्ल्ड कप इंग्लंडनं जिंकला. पण हाच वर्ल्ड कप अनेक खेळाडूंसाठी एक मोठी संधी ठरण्याची शक्यता आहे. कारण येत्या डिसेंबरमध्ये आयपीएलचा लिलाव आहे. आणि या लिलावात वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी बजावलेल्या खेळाडूंवर फ्रँचायझींची नजर असणार आहे.

27

या लिस्टमध्ये सर्वात वरच्या नंबरवर असेल तो म्हणजे इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा ऑल राऊंडर बेन स्टोक्स. स्टोक्स याआधीही आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यानं आयपीएलमध्ये दोन शतकही ठोकली आहेत. पण गेल्या काही मोसमात तो वैयक्तिक कारणामुळे खेळला नव्हता. पण आता फ्रँचायझी त्याच्यावर तगडी बोली लावतील असा अंदाज आहे.

37

या वर्ल्ड कपमधला आणखी एक सुपरस्टार आहे तो म्हणजे सॅम करन. सॅम करन 2020 आणि 2021 च्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. पण यंदा त्यानं आयपीएलमधून आपलं नाव मागे घेतलं होतं. टी20 वर्ल्ड कपमध्ये तो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलाय. त्यामुळे आयपीएल लिलावात करनला यंदा चढा भाव मिळण्याची शक्यता आहे.

47

सॅम करननं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 13 विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरलेला तो आजवरचा पहिलाच बॉलर आहे.

57

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज रायली रुसोही सर्वांच्या नजरेत आलाय. वर्ल्ड कपआधी भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या रुसोनं टी20त शतक ठोकलं होतं. त्यानंतर वर्ल्ड कपमध्येही त्यानं शतकी खेळी केली.

67

ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीननं वर्ल्ड कपमध्ये काही विशेष कामगिरी बजावली नाही. कारण जोश इंग्लिसची रिप्लेसमेंट म्हणून त्याला टीममध्ये जागा मिळाली होती. पण त्याआधी भारताविरुद्धच्या टी20 मालिकेत त्यानं चांगलीच फटकेबाजी केली होती. तो एक बॅटिंग ऑलराऊंडर आहे. त्यामुळे फ्रँचायझी त्याच्यासाठी चांगली किंमत मोजू शकतात.

77

आयर्लंडच्या जोशुआ लिटलनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या युवा गोलंदाजानं वर्ल्ड कपविजेत्या इंग्लंडलाच मोठा धक्का दिला होता. इंग्लंडनं या वर्ल्ड कपमध्ये एकमेव सामना गमावला तोही आयर्लंडविरुद्ध. त्या मॅचमध्ये लिटलची कामगिरी फार मोठी होती. या डावखुऱ्या गोलंदाजावरही चांगली बोली लागू शकते.

  • FIRST PUBLISHED :