पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतला चौथा सामना कराचीत खेळला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा पाकचा कर्णधार बाबर आजमची बॅट तळपली. त्याने 117 चेंडूत 107 धावांची खेळी केली.
कराचीत केलेल्या या शतकी खेळीसह बाबर आजमने इतिहास घडवला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 5 हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. बाबर आजमने ही कामगिरी अवघ्या 97 डावात केली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 5 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आहे. आमलाने ही कामगिरी 101 डावात केली होती.
तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव रिचर्ड्स हे आहेत. रिचर्ड्स यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 114 डावात पाच हजार धावा केल्या होत्या.
चौथ्या स्थानी भारताचा विराट कोहली असून त्यानेही 114 डावात 5 हजार धावांचा टप्पा गाठला होता.
पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 115 डावात पाच हजार धावा केल्या होत्या.