भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल गुरुवारी प्रेयसी मेहा पटेलसोबत लग्नबंधनात अडकला. दोघांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी२० मालिकेतून ब्रेक घेत अक्षर पटेलने मेहासोबत लग्न केलं. वडोदरा इथं दोघांचा लग्नसोहळा पार पडला.
अक्षर आणि मेहा यांनी लग्नाचे फोटो अद्याप शेअर केलेले नाहीत. मात्र हळदी, मेहंदी, संगीत सेरेमनी याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अक्षर आणि मेहा यांनी गुजराती पद्धतीने लग्न केलं. अक्षरने यावेळी पारंपरिक पगडी बांधल्याचं दिसतं.
मेहा पटेल एक डायटिशियन आणि न्यूट्रिशियनिस्ट आहे. मेहा सोशल मीडियावर सक्रीय असून नेहमी डाएट प्लॅन शेअर करत असते.
लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे फोटो समोर आले असून यात भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनादकटसुद्धा दिसत आहे.