ATK मोहन बागानने बंगळुरु एफसीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने पराभूत करत आयएसएलचे विजेतेपद पहिल्यांदाच पटकावलं. शनिवारी रात्री गोव्यात जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर अंतिम सामना झाला.
सामना एक्स्ट्रा टाइममध्ये पोहोचला होता, पण त्यात एकाही संघाला गोल करता आला नाही. बंगळुरुला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. शेवटी पेनल्टी शूटआऊटमध्ये मोहन बागानने बाजी मारली.
फुल टाइमपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते. मोहन बागानकडून ऑस्ट्रेलियन खेळाडू दिमित्री पेट्राटॉसने दोन गोल केले. तर बंगळुरुकडून पहिला गोल सुनील छेत्रीने आणि दुसरा गोल रॉय कृष्णाने केला.
ISLचे विजेतेपद पटकावलेल्या ATK मोहन बागानला ६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तर रनरअप राहिलेल्या बंगळुरू एफसीला २.५ कोटी रुपये मिळाले.
ATK मोहन बागानने विजेतेपद पटकावल्यानंतर क्लबचे मालक संजीव गोयंका यांनी मोठी घोषणा केली. क्लबला भविष्यात मोहन बागान सुपर जायंट्स म्हणून ओळखलं जाईल असं त्यांना सांगितले.