रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने मंगळवारी रात्री आयपीएल २०२३ मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. पाचव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला १४ धावांनी हरवलं. या सामन्यात २०व्या षटकात डावखुरा गोलदाज अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त गोलंदाजी केली. सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १९२ धावा केल्या होत्या. तर हैदराबादला १७८ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.