टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आज 35व्या वर्षात पदार्पण केलं. विराट सध्या टी20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियात आहे. मेलबर्नमध्ये आज टीम इंडियाकडून विराटचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
विराटच्या वाढदिवसाला पत्नी अनुष्का शूटिंगमुळे ऑस्ट्रेलियात पोहोचलेली नाही. पण तिनं सोशल मीडियात विराटचे काही हटके फोटो शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्कानं इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. यात विराट फनी अंदाजात दिसतोय.
अनुष्कानं शेअर केलेल्या या फोटोंवर क्रिकेट आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केली आहे.
विराटचे हे फोटो पहिल्यांदाच जगासमोर येत आहेत
सोशल मीडियात अनुष्कानं शेअर केलेल्या या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा आहे.