ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचं नाव इंग्रजीमध्ये A आणि मराठीमध्ये 'अ' अक्षरानं सुरू होतं, ते लोक खूप मेहनती असतात. आपल्या मेहनतीने ते अशक्यप्राय कामंही शक्य करून दाखवतात. ज्या लोकांचं नाव A किंवा 'अ' ने सुरू होतं, ते खूप प्रामाणिक असतात आणि त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते.
ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या लोकांचं नाव इंग्रजीच्या 'K' आणि मराठीच्या 'क' आणि 'ख' ने सुरू होतं, असे लोक साध्या स्वभावाचे असतात. हे लोक सर्वांना हसतमुखाने भेटतात. लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विशेष कृपा त्यांच्यावर राहते. त्यांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
ज्या लोकांचे नाव मराठीच्या 'प' किंवा 'फ' आणि इंग्रजीच्या 'P' ने सुरू होते, ते लोक आयुष्यात खूप नाव आणि पैसा कमावतात. असे लोक अतिशय सुसंस्कृत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असतात. तसंच, प्रत्येकाच्या भावनांची काळजी घेतात. या लोकांमध्ये कोणालाही लवकर आकर्षित करण्याची क्षमता असते.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचे नाव इंग्रजीत 'S' अक्षराने सुरू होते, मराठीमध्ये 'स' किंवा 'श' ने सुरू होत असतं, ते कोणतंही काम करण्यास मागे हटत नाहीत. ही खासियत या लोकांना प्रत्येक गोष्टीत यश मिळवून देते. हे लोक त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा कमावतात आणि सर्व प्रकारच्या सुखसोयींचा आनंद घेतात.