NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / 11 टन सोनं आणि तब्बल 17 हजार कोटी रुपये बँकेत; तिरुपती संस्थाबद्दल हे माहितीये का?

11 टन सोनं आणि तब्बल 17 हजार कोटी रुपये बँकेत; तिरुपती संस्थाबद्दल हे माहितीये का?

तिरुपती बालाजीला सर्वाधिक उत्पन्न भाविकांनी केलेल्या दानातून मिळतं. त्याखालोखाल केशदानातून उत्पन्न मिळतं.

15

आंध्र प्रदेशातल्या तिरुमला पर्वतावर असलेल्या भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या नावे वेगवेगळ्या बँकांमध्ये तब्बल 17 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत, अशी माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानाने नुकतीच जाहीर केली आहे. अलीकडेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेत तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी एका पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे भगवान बालाजीच्या मंदिराशी निगडित विविध प्रकारची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, तिरुमला पर्वतावरच्या या मुख्य देवतेच्या संपत्तीत 1.2 टन वजनाचे सोन्याचे दागिने आणि 10 टन चांदीचा समावेश आहे. सुमारे 11 टन सोनं बँकांमध्ये ठेवलेलं आहे.

25

2009-10 या काळात दररोज सुमारे 50 हजार भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देत होते. आजच्या घडीला ही संख्या दररोज सुमारे लाखभरापर्यंत गेली आहे. साहजिकच मंदिराच्या उत्पन्नातही त्याच प्रमाणात वाढ झाली आहे. भाविकांनी दान केलेले आपल्या डोक्यावरचे केस, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, दर्शनासाठी विक्री केली जाणारी तिकिटं, प्रसादाच्या लाडूंची विक्री, भाविकांच्या वास्तव्यासाठी खोल्या उपलब्ध करणं आणि भाविकांनी केलेलं दान अशा विविध मार्गांनी देवस्थानाच्या उत्पन्नात भर पडत असते.

35

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वार्षिक बजेटमध्ये दरवर्षी 100 कोटी रुपयांची वाढ होत आहे. 2009-10मध्ये देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष डी. के. आदिकेसावुलू नायडू यांनी 1365.05 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटला मंजुरी दिली होती. तसंच त्यावर्षी 521.04 कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित होतं. 2011-12मध्ये 555 कोटी रुपयांचं उत्पन्न दानाच्या रूपात मिळाल्यानंतर त्यावर्षी 1661.66 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटला मंजुरी देण्यात आली होती. त्याच वर्षी 650 कोटी रुपयांचं उत्पन्न दान स्वरूपात मिळणं अपेक्षित होतं.

45

कोरोना लॉकडाऊन काळात या देवस्थानाला दान स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. 2020-21मध्ये 1300 कोटी रुपये उत्पन्न मिळणं अपेक्षित असताना त्यावर्षात 721 कोटी रुपयेच मिळाले. त्यामुळे देवस्थानाने वार्षिक बजेटमध्ये सुधारणा करून ते 2553 कोटी रुपयांवर मर्यादित ठेवलं. वास्तविक 2020-21 साठी 2837 कोटी रुपयांचं बजेट मंजूर झालं होतं. 2021-22साठी 2937.85 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटला मंजुरी देण्यात आली होती, तर 2023-24साठी तब्बल 4411.68 कोटी रुपयांच्या वार्षिक बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.

55

सध्या दानातून मिळणाऱ्या उत्पन्नात दर महिन्याला 100 कोटी रुपयांहून अधिक भर पडत आहे. त्यामुळेच यातून देवस्थानाला वर्षभरात 1200 ते 1300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल. शिवाय, भाविक बालाजीला केशदान करतात. त्या माध्यमातून 150 कोटी ते 170 कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे. बँकेतल्या ठेवींवरच्या व्याजाच्या रूपानेही देवस्थानाला कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्याशिवाय वेगवेगळ्या सेवांचं शुल्क, लाडूंची विक्री, भाविकांना राहण्यासाठी खोल्या देणं या इतर माध्यमांतूनही उत्पन्न मिळतं. मात्र भाविकांनी केलेल्या दानातून सर्वाधिक उत्पन्न मिळतं आणि त्याखालोखाल उत्पन्न केशदानातून मिळतं. त्याशिवाय 6000 एकर वनजमीन देवस्थानाच्या नावावर आहे.

  • FIRST PUBLISHED :