मुनेश्वरम मंदिर, श्रीलंका : श्रीलंकेतील मुनेश्वरम मंदिर शिवभक्तांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे शिव मंदिर रामायण काळात बांधले गेले होते आणि त्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. रावणाचा पराभव केल्यानंतर श्रीरामांनी येथे बसून शिवाची आराधना केली, असे सांगितले जाते. Photo Credit : Lost Temples (twitter)
अरुल्मिगु श्री राजकालियाम्मान मंदिर, मलेशिया : मलेशियातील हे शिव मंदिर 1922 मध्ये बांधले गेले होते, ज्याचे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते. काचेचे बनवलेले हे पहिले शिवमंदिर आहे आणि या मंदिराच्या भिंतीवर 3,00,000 रुद्राक्षांच्या माळा आहेत, ज्या खरोखर भव्य दिसतात. हे मंदिर जोहर बारूच्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. Photo Credit : Vertigo_Warrior (twitter)
पशुपतिनाथ मंदिर, नेपाळ : नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरही खूप प्रसिद्ध आहे. येथे जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात. भगवान शिवाचे हे अतिशय प्राचीन मंदिर काठमांडू येथे आहे. जे बागमती नदीच्या काठावर आहे. भगवान शिव हे येथील सर्व राज्यकर्त्यांचे अधिष्ठाता दैवत आहेत. Photo Credit : Raghu (twitter)
झुरिच, स्वित्झर्लंडमधील शिव मंदिर : स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे असलेले हे शिवमंदिर त्याच्या वास्तुकलेसाठी खूप लोकप्रिय आहे. या मंदिरात शिवलिंग, नटराज मूर्ती आणि माता पार्वती विराजमान आहेत. Photo Credit : facebook and youtube
शिव मंदिर, ऑकलंड, न्यूझीलंड (शिव मंदिर, ऑकलंड, न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे असलेले शिवमंदिर आचार्य महामंडलेश्वर स्वामी शिवेंद्र महाराज आणि यज्ञबाबा यांनी बांधले होते. येथे भगवान शिव नवडेश्वर शिवलिंगाच्या रूपात विराजमान आहेत. 2004 मध्ये पहिल्यांदा या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडण्यात आले होते. Photo Credit : aartigyan.com