NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Horoscope : बुध ग्रहाचा 'या' राशीत प्रवेश! 'या' राशींची होणार चांदी, तुमची रास आहे का यात?

Horoscope : बुध ग्रहाचा 'या' राशीत प्रवेश! 'या' राशींची होणार चांदी, तुमची रास आहे का यात?

ग्रहांनी आपली रास बदलली की, अनेक शभ-अशुभ योग तयार होतात. ज्याचा वेगवेगळ्या राशींवर प्रभाव पडतो.

18

ज्योतिषशास्त्रानुसार कुंडली आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कुंडलीतील ग्रहांचा, राशींचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. त्यामुळे ग्रहांची स्थिती आणि राशींची अवस्था योग्य असणं महत्त्वाचं असतं.

28

मीन : या राशीच्या तृतीय स्थानात बुधादित्याचा प्रभाव पडेल. ज्याचा परिणाम म्हणून आपलं भावासोबतचं नातं अधिक दृढ होणार आहेत. आपली थकलेली कामं पूर्ण होतील. शिवाय कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये निकाल आपल्या बाजूने लागेल.

38

असं म्हणतात की, ग्रहांनी आपली रास बदलली की, अनेक शभ-अशुभ योग तयार होतात. ज्याचा वेगवेगळ्या राशींवर प्रभाव पडतो. 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल, अशी माहिती बैद्यनाथधामच्या ज्योतिषचार्यांनी दिली होती. त्यानुसार काल हा ग्रहप्रवेश झाला असून त्यामुळे 'बुधादित्य राजयोग' सुरू झाला आहे.

48

ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुदगल यांनी सांगितलं की, शुक्राची रास असलेल्या वृषभमध्ये बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग झाला आहे, ज्याचा वृषभ, सिंह, कन्या, कर्क आणि मीन या राशींवर सकारात्मक परिणाम होईल. तर 24 जून रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत बुध ग्रह वृषभ राशीतच राहणार आहे. त्यामुळे त्याचा नेमका काय परिणाम होईल जाणून घेऊया.

58

वृषभ : या राशीमध्येच बुधादित्य योग तयार झाल्याने या राशीच्या व्यक्तींना त्याचा विशेष लाभ होईल. त्यांना कार्यक्षेत्रात यश मिळेल, शिवाय नोकरीसंबंधितही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. बढती मिळाल्याने, धनलाभ झाल्याने आपला आत्मविश्वास आपसूकच वाढेल. तर, तरुणांसाठी हा लग्न जुळण्याचा योग आहे.

68

सिंह : या राशीच्या कर्मस्थानात बुधादित्याचा प्रभाव पडेल. जो या राशीच्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येईल. या योगामुळे आपल्याला वडिलांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांची प्रकृतीही उत्तम राहील. त्याचबरोबर आपल्याला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी, व्यवसायात बढती मिळण्याची आणि थकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. थकलेली कामंही पूर्ण होतील. शिवाय कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.

78

कन्या : या राशीच्या भाग्य स्थानात बुधादित्याचा प्रभाव पडेल. त्यामुळेच या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत भाग्योदयाचा ठरेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.

88

कर्क : या राशीच्या लाभस्थानात बुधादित्याचा प्रभाव पडेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी मोठी खुशखबर आहे. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपलं प्रचंड कौतुक होईल, शिवाय नवी जबाबदारीही मिळेल. आपल्या घरात शुभकार्य घडेल. या काळात आईची प्रकृती उत्तम राहील आणि तिच्याकडून आपल्याला आर्थिक मदतही मिलेल. करिअर आणि आर्थिक परिस्थितीशी निगडित यश मिळवून देणारा असा हा आपल्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी ठरेल.

  • FIRST PUBLISHED :