गणेश चतुर्थीला सकाळी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली.
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी मुख्य मंदिरापासून श्रीं ची आगमन मिरवणूक सकाळी ८.३० वाजता फुलांनी साकारलेल्या गरुड रथातून काढण्यात आली.
श्रीं च्या मूर्तीसोबत देवी सिद्धी, देवी बुद्धी तसेच गणेश परिवारातील मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या प्रतिष्ठापनेनंतर भाविकांनी श्रीं च्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
श्री पंचकेदार मंदिर भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे. हे मंदिर केवळ देखावा नसून या मंदिर उभारणीत अनेक प्रतीकांचा, मूर्तींचा आणि लक्ष, लक्ष दिव्यांचा वापर केलेला आहे.