NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / अध्यात्म / Celebrities at siddhivinayak temple : हा आहे सेलेब्रिटींचा लाडका बाप्पा; अनवाणी चालत जाऊनही घेतात दर्शन

Celebrities at siddhivinayak temple : हा आहे सेलेब्रिटींचा लाडका बाप्पा; अनवाणी चालत जाऊनही घेतात दर्शन

चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मुंबईतील प्रसिद्ध गणपतीचं दर्शन घेतात. मग त्यांचा नवीन एखादा चित्रपट असो किंवा वाढदिवसाचं कारण असो. हे कलाकार सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पापुढे डोकं टेकवून आशीर्वाद घेतात. हे कलाकार भक्तिभावाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दिसतात. काही कलाकारांनी तर अनवाणी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. सुद्धा आज बघूया आतापर्यंत कोणकोणत्या कलाकारांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली आहे.

113

रणवीर आणि दीपिका यांनी लग्न झाल्यावर एकत्र सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.

213

अमिताभ बच्चन हे त्यांच्या परिवारासोबत अनेकदा सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना दिसतात.

313

अभिनेत्री करीना कपूरने तिच्या हिरोईन या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.

413

कार्तिक आर्यनने देखील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.

513

अभिनेता संजय दत्तने जेलमधून सुटताच सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.

613

अभिनेत्री कंगना रानौतने देखील 'मणिकर्णिका' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.

713

प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री सनी लिओनी यांनी त्यांच्या चित्रपट प्रदर्शनापूर्वी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.

813

प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या 'धर्मवीर' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर सपत्नीक सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले होते.

913

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर हिने 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी परिवारासोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.

1013

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुलीच्या पहिल्या वाढदिवशी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते.

1113

अभिनेता सलमान खानने त्याच्या 'जय हो' चित्रपटाच्या यशासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केली होती.

1213

दीपिका पदुकोण हिने आजपर्यंत अनेकदा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी तिने दर्शन घेतले होते.

1313

ऐश्वर्या राय बच्चन अभिषेक बच्चन अनेकदा सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेताना दिसतात.

  • FIRST PUBLISHED :