आज राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे, ठाणे, पालघर, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे
तर मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे
विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारपासून पुण्यात पावसाचा जोर थोडा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सोमवारपासून पुढील 3 दिवस पुण्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईमध्येही 26 जुलैपर्यंत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.