हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत बुधवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याशिवाय, गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि शुक्रवारीही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबईसाठी बुधवार ते शुक्रवार म्हणजेच 5 ते 7 जुलै दरम्यान 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
तर आज पुण्यामध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे
पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनाही आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
तर मुंबई आणि ठाण्यात पावसाचा यलो अलर्ट आहे
गुरुवारीही पुणे आणि साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.