आज पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता असून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यासोबतच राज्यातील रत्नागिरी, पालघर, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे
या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे
मुंबईत गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली
आज मात्र शहरात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज आहे
आज राज्यातील केवळ रायगड जिल्ह्यातच ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे