राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसऴधार ते अतिमुसऴधार पावसाचा अंदाज आहे
मराठवाड्यामध्येही पावसाचा जोर पाहायला मिळेल. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के एस होसळीकर यांनी याबाबतची माहिती दिली
रविवारी म्हणजेच आज रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे
रायगडमध्ये पुढचे सलग 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्येही आज सरी बरसण्याची शक्यता आहे.
सोमवारी मुंबईमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे