NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / बातम्या / White Discharge : अंगावरून पांढरे पाणी जात आहे? घाबरू नका; करा 'हे' प्राथमिक उपाय

White Discharge : अंगावरून पांढरे पाणी जात आहे? घाबरू नका; करा 'हे' प्राथमिक उपाय

महिलांच्या गुप्तांगातून होणाऱ्या पांढर्‍या स्रावाला व्हाईट डिस्चार्ज किंवा सामान्य भाषेत अंगावरून पांढरे पाणी जाणे असे म्हणतात. मात्र याचा अर्थ असा नाही की हा स्त्राव नेहमीच पांढरा असतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये याचा रंग पिवळा, राखाडी, हिरवा किंवा तपकिरी असू शकतो. याचे प्रमाण खूप जास्त वाढल्यास यामुळे गंभीर नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला यावर घरगुती उपाय सांगणार आहोत.

17

पांढऱ्या स्त्रावामुळे शरीर अशक्त होते. कधीकधी हा पांढरा स्त्राव इतका अधूनमधून येतो की, तो मासिक पाळीसारखा दिसतो. काही महिलांना मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर पांढरा स्त्राव जाणवतो. या पांढर्‍या स्रावामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हे योनी क्षेत्र अस्वच्छ असल्यामुळे होऊ शकते. बऱ्याचदा त्यातून दुर्गंधीही येऊ शकते. त्यामुळे इरिटेशन होते आणि आपल्याला अस्वस्थ वाटू शकते.

27

मात्र कमी प्रमाणात हा स्त्राव येत असल्यास तो नुकसानकारक नसतो. महिलांनी कठोर परिश्रम किंवा जड काम केल्यास हा त्रास होऊ शकतो. थोड्या प्रमाणात हा स्त्राव नियमितपणे येणे चांगले आहे. कारण यामुळे तुमचे शरीर निरोगी अवस्थेत कार्यरत आहे असे दिसते. या स्रावाद्वारे योनी स्वतःला स्वच्छ करते आणि त्यातील कचरा बाहेर टाकते.

37

मेथी दाणे : मेथीचे दाणे पाण्यात उकळून ते प्यायल्याने पांढऱ्या स्रावाची समस्या दूर होते. यासाठी दोन ग्लास पाण्यामध्ये मेथीचे दाणे टाकून उकळा. पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड झाल्यावर प्या.

47

धने : धने म्हणजेच कॉरिएंडर सीड्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. पांढर्‍या स्रावावर उपचार करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि सुरक्षित घरगुती उपाय आहे.

57

भेंडी : पांढर्‍या स्रावाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी सर्वांना आवडणारी भेंडी खूप उपतुक्त असते. यासाठी काही भेंड्या पाण्यात उकळा आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि हे प्या. काही स्त्रिया भेंडी दह्यात भिजवून तिचे सेवन करतात.

67

आवळा : आवळा हासुद्धा पांढरा स्त्राव कमी करण्यासाठी उपयुक्त पदार्थ आहे. व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेला आवळा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो आणि तुम्हाला निरोगी ठेवतो. आवळा आपण कसाही खाऊ शकतो. कच्चा, त्याची पावडर करून किंवा मुरंबा आणि घरगुती कँडीजच्या स्वरूपात. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने पांढर्‍या स्रावाच्या समस्येवरही उपचार होतात.

77

तुळस : औषधी फायद्यासाठी लोक अनेक वर्षांपासून आपल्या घरासमोर आवर्जून तुळस लावतात. काही तुळशीची पाने पाण्यात बारीक करून त्यात मध टाकून प्या. पांढऱ्या स्रावाची समस्या दूर करण्यासाठी दिवसातून दोनदा हे पेय प्या. तुम्ही दुधासोबतही तुळशीचे सेवन करू शकता.

  • FIRST PUBLISHED :