अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते. मार्केटमध्ये काय ट्रेंड सुरू आहे यावरही तिचं लक्ष असतं.
दररोज सकाळी ती आर्वजून पेपर वाचते. आजूबाजूला काय घडत असतं याची अपडेट ती ठेवत असते, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
ती बातमी होती सोने चांदीच्या दरात झालेल्या घसरणीची. प्राजक्तानं ती बातमी वाचली आणि ती भलतीच खुश झाली.
स्वत:च्या प्रेमात पडत तिनं फोटो पोस्ट केले. पोस्ट लिहित म्हणाली, "फक्त पारंपरिक मराठी अलंकार मिळण्याचं एकमेव ठिकाण प्राजक्ताराज आहे".