हल्लीच रशिया आणि युक्रेनच्या वॉरबद्दल बऱ्याच बातम्या समोर आल्या आहेत. तुम्ही अनेक देश आणि त्यांच्या सेनेबद्दल तसेच त्यांच्या कडे असलेल्या हत्यारांबद्दल ऐकले असेल. कोणत्या देशाची आर्मी, एअरफोर्स, नेवी किती पावरफुल आहे, याबद्दल अनेक चर्चा होतातय पण तुम्हाला माहितीय का की जगात असे काही देश आहेत. ज्यांच्याकडे कोणतीही सेना नाही. हो हे खरं आहे. मग आता तुमच्या मनात नक्कीच त्या देशांबद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता लागली असेल. चला त्यांच्याबद्दल काही माहिती घेऊ.
यामध्ये पहिले नाव येते ते मॉरिशसचे (Mauritius). येथील लोकसंख्या केवळ 13 लाखांच्या आसपास आहे. त्यांच्याकडे फक्त 10,000 पोलिस कर्मचारी आहेत, जे देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा पाहातात.
या यादीत दुसरा देश मोनॅको (Monaco)आहे. हा जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे. येथे फक्त 31 हजार लोक राहतात. फ्रेंच सैन्य इथल्या लोकांना सुरक्षा पुरवते.
तिसरा देश आहे कोस्टा रिका (Costa Rica) आहे. या देशाला 'मध्य अमेरिकेचे स्वित्झर्लंड' असेही म्हणतात. 1948 मध्ये येथे भीषण गृहयुद्ध सुरू झाल्यामुळे या देशाने आपले सैन्य संपवलं होतं. आता सध्याचे पोलीसच या देशाचे रक्षण करतात.
या यादितील चौथा देश आहे आइसलँड (Iceland). या देशाकडे स्वतःचे सैन्य नाही, परंतु हा देश नाटोचा सदस्य आहे. त्यामुळे या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेची आहे.
ग्रेनेडा (Grenada) हा पाचवा देश आहे ज्याच्याकडे स्वत:चं सैन्य नाही. ग्रेनेडा हे कॅरिबियन समुद्रातील लेसर अँटिल्सच्या उत्तरेकडील भागात स्थित एक बेट आहे. 1983 मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर येथे लष्कर नाही. येथील रॉयल ग्रेनेडा पोलीस दल आपल्या देशाचे तटरक्षक दलाच्या रूपात संरक्षण करते.
सेंट लुसिया (ST.lucia)हे देखील एक बेट राज्य आहे. हे वेस्ट इंडिजचे आहे आणि राष्ट्रकुल राष्ट्रांचे सदस्य आहे. या देशाकडे स्वतःचे कोणतेही लष्करी बळ नाही. हा देश नौदल युनिटद्वारेच स्वतःचे संरक्षण करतो.