भारतात जवळपास सगळीकडेच दिवाळी साजरी केली जाते. तर काही भाग असेही असतात जिथे हा सण साजरा केला जात नाही. या ठिकाणी ना लक्ष्मीपूजन होतं ना फटाके फोडले जातात.
देशभऱात सगळीकडे दिवाळीचे फटाके फोडले जात असताना इथे मात्र एक दिवाही लावला जात नाही. आम्ही बोलत आहोत केरळ या राज्याबद्दल. भारतातील केरळ या राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत नाही.
आता याचं कारण जाणून घेऊया. केरळमध्ये ओनमपासून ख्रिसमस आणि शिवरात्री अतिशय उत्साहात साजरी केली जाते. मात्र दिवाळीबद्दल बोलायचं झाल्यास, इथे काहीही उत्साह पाहायला मिळत नाही.
केरळमध्ये केवळ कोचीमध्येच दिवाळी साजरी केली जाते. फक्त तिथेच तुम्हाला घराबाहेर दिवे दिसतील. याशिवाय कुठेच तुम्हाला रोषणाई दिसणार नाही.
यामागे अनेक कारणं आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे केरळमधील महाबली राज. महाबली राक्षस होता आणि केरळात त्याला पुजलं जातं. दिवाळी साजरं करण्याचं कारण आहे रावणावर रामाचा विजय. अशात एक राक्षसाची हार केरळचे लोक साजरी करत नाहीत.
केरळमध्ये हिंदू धर्म मुख्य नाही. इथे हिंदू लोक खूप कमी आहेत. अशात दिवाळीमध्ये इथे फार उत्साह पाहायला मिळत नाही. सोबतच या काळात केरळमध्ये मान्सून परततो. यामुळे तिथे भरपूर पाऊस होतो. त्यामुळे फटाके आणि दिवे पेटवले जात नाहीत.
याशिवाय आणखी एक कारण आहे. दिवाळीच्या आधीच इथे ओनम सण साजरा केला जातो. यामुळे लोक आपली सेव्हिंग यावरच खर्च करतात. यामुळे दिवाळी सण इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही.
केरळशिवाय तमिळनाडूमध्येही दिवळीचा फारसा उत्साह नसतो. दिवाळीच्या आधी तिथे नरक चतुर्दशी साजरी केली जाते.