साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या दिवशी पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
लाडक्या गणपती बाप्पाच्या भोवती यावेळी आकर्षक आरास करण्यात आली होती.
दगडूशेठ गणपती मंदिराचं कळसही यावेळी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं होतं.
अक्षय्यतृतीयेला आंब्याचं मोठं महत्त्व असतं. हेच महत्त्व लक्षात घेऊन आंब्यांची आरास दगडूशेठ गणपतीला करण्यात आली होती.
गणपती बाप्पाचा हे मनोहरी रूप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.
पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे हा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.